शनिवार, २७ जुलै, २०१९

निरपेक्ष होते मी असे म्हणणार नाही,
प्रेम पण आता पुन्हा करणार नाही।

या जीवाला अन्यथा दु:खे किती
त्यास आता मारवा स्फुरणार नाही।

तु आता ये वा कधी येऊ नको
तव स्मृतींनी मी कधी झुरणार नाही।

समजले मज विश्व हे स्वार्थी कसे,
तू नि मी अपवाद ही ठरणार नाही।

ये जरा वेचू फुले रोमांस ची
"प्रेम" करता खाकही उरणार नाही!

मयुरी बिरारी खैरनार
आठवतो जो क्षणोक्षणी जो,
Love story चा श्वास तू,
आता जायचे कुठे आणखी,
मार्ग ही तू अन् प्रवास तू..
व्यसन लागले तुझे मला रे
Whiskey चा जणु सुवास तू
येता जाता हसतांना अन्
रडतांना ही हवास तू...
तुझ्याबरोबर वाटे awesome,
Boyfriend firstclass tu,
बाकी सगळे असतील nice,
सर्वांपेक्षा झक्कास तू..
स्टोरी मधला twist होउनी
घडलेला climax tu,
Happening झाले हे जीवन
छप्पर फाडुनी आलास तू.
mayuri
तुझ्याविना मन झाले वेडे हाय जरासे,
भेटुन जाशील खिड़की मधुनी काय जरासे!

तुझ्या नि माझ्या स्टोरी मध्ये ट्विस्ट किती हे,
करुन टाकू बसून सिंप्लीफाय जरासे!

प्रेम व्हर्चुअल केले असते मीही तुजवर
अडखळते पण मधेच हे वाय फाय जरासे!

तेच तेच जीवन झाले रे बोरींग आता,
मला आवडते लाइफ जे साय फाय जरासे!

वेळेची टंचाई असली म्हणुन काय तर,
करु एक्सप्रियंस आपण मैग्निफाय जरासे!!!

#mayuri