गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२
आज T V चालू केला कि कोणत्याही मराठी वाहिनीवर जा, विविध मालिकांचा भरणा झालेला दिसतो. त्यातही काही वाईट नाही, पण त्या मालिकांमध्ये काहीतरी कलात्मक आणि वैचारिक दर्जा तर असायला हवा. आज जग एकीकडे प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आपल्याला आपले संपूर्ण आयुष्य कमी पडेल एवढे ज्ञान जगात भरले आहे. असे असतांना या मालिका दररोज दिवसातून ३-३ वेळा त्याच त्याच विकृत लोकांनी निर्माण केलेल्या समस्या दाखवत आहेत. ए
का ठिकाणी काय कोणी कोणाचा अपमानच करत असते तर दुसरीकडे कुटील कारस्थाने चालू असतात, तर तिसरीकडे चाबकाने मारणे चालू असते आणि लोक ते बघण्यात तासंतास रंगून गेलेले असतात आणि या मालिका अशा प्रकारे जाहिरातबाजी करतात कि एकदा जरी जाहिरात बघितली किवा पोस्टर बघितले तरी कथा आपल्या लक्षात यावी. तेसुद्धा प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रत्येक ब्रेअक मध्ये.
हि कथानके थोडाफार बदल करून एकाच अंगाने जाणारी असतात.एक अत्यंत सज्जन सुशील स्त्री आणि बाकीचे सर्व तिला छळणारे लोक हा नेहमीचा format आहे.त्यादिवशी आम्ही एक मराठी चित्रपट बघण्यास बसलो असता खूप ब्रेअक्स होत होते आणि प्रत्येक ब्रेअक मध्ये २-३ वेळा एका सेरीअल ची जाहिरात लागत होती.त्यातील घटनांना अतिशय नाटकी आणि भडक पद्धतीने दाखवले जात होते.
वास्तविक महाराष्ट्रात, भारतात, जगात इतक्या सुंदर गोष्टी आहेत आणि त्यात इतकी व्यापकता आहे त्यावर अनेक कार्यक्रम बनवता येतील. पण अशा प्रकारच्या गोष्टींचा मारा लोकांवर केला जातो कि त्यातूनnकाहीही हाती लागत नाही. घरातील महिला हे सगळा अतिशय नियमितपणे बघत असल्याने लहान मुलेही तेच बघू लागतात. त्यात अतिशय हास्यास्पद मेक अप्स , संवाद आणि हावभाव असलेल्या स्त्रिया लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात.
खरे तर देशाच्या प्रगतीसाठी माणसाच्या शैक्षणिक विकासाबरोबरच वैचारिक विकासही आवश्यक आहे आणि त्यासाठी बुद्धीला उत्तम विचारांचे पोषण हवे, पण जर तासंतास चालणाऱ्या मनोरंजनाचा हा दर्जा असेल तर ते कसे काय साधेल?
काळ संध्याकाळीच पुण्यातल्या जे एम रोडवर फिरायला म्हणून गेलो होतो. तसा पहिला तर हा भाग पुण्यातल्या अतिशय प्रमुख भागांमध्ये गणला जातो. शिवाय येथे फार उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू लोक येत असतात. परंतु तेथील दृश्य पाहून अतिशय वाईट वाटले. कुठे प्लस्तिक्चे ग्लासेस वापरून रस्त्यात फेकलेले होते तर कुठे वेफर्सची पाकिटे पडलेली होती तर कुठे थर्माकोलच्या प्लेट्स.
एकीकडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इको फ्रेंडल
ी गणेशोत्सवाचा इतका प्रचार चाललेला असताना दुसरीकडे अशा प्रकारे एका सुशिक्षित विभागात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या कचऱ्याचा असा ढीग असणे मनाला पटत नाही. आणि हे सगळे अरीशय सुशिक्षित वर्गाकडून होत असते हे आणखीनच निराशाजनक आहे.
आज जग ग्लोबल वॉर्मिंगच्या आणि इतर समस्यांच्या इतके जवळ येऊन ठेपलेले असताना देखील
सुसंस्कृत वर्गालाहि जाग येत नाही तर मग इतर लोकांचे काय? परंतु याची फळे आज न उद्या सर्वांनाच भोगावी लागणार आहेत.
रविवार, १५ एप्रिल, २०१२
युगंधर
युगंधर या कादंबरीविषयी बोलायचं झालं तर सर्वप्रथम या महान साहित्याविष्काराला "कादंबरी" असेदेखील म्हणावेसे वाटत नाही. हा तर आहे एक दिव्य प्रवास, विराट विश्वरूप विश्वत्म्याच्या दिव्य अशा मानवयोनीचा! हे शिवधनुष्य पेलण्याचं कार्य तितक्याच ताकदीने आणि सरसतेने केलं गेलं आहे. श्रीकृष्ण, जो अख्ख्या भारतवर्षाच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे किंबहुना तो सर्वांच्या आत्म्यातच स्थित आहे, त्याचा जीवनपट उलगडून दाखवतांना आदरणीय शिवाजी सावंत यांच्या लेखणीला जी धार चढली आहे ती अभूतपूर्व आहे.
मला या प्रवासात आणखीनच उल्लेखनीय आणि अद्वितीय वाटला तो लेखकाचा दृष्टीकोन आणि उद्देश!. ज्या प्रकारे त्यांनी या दिव्य आणि अद्भुत वाटणाऱ्या घटनांची मांडणी केली आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती संस्कृतीची महान सेवा वाटते. कारण त्यांनी पौराणिक श्रीकृष्णचरीत्राचे संदर्भ, भोळ्याभाबड्या भक्तगणांनी रचलेल्या काही खऱ्या तर काही काल्पनिक कथा, अंधश्रद्धा , वेगवेगळ्या प्रकारचे आकलन या सर्वांचे श्रेष्ठ मंथन केले. त्यातील अंधाश्राद्धात्मक आणि काल्पनिक भाग बाजूला काढला आणि जणू काही त्या बालगोपालाला आवडणारे शुद्ध लोणीच त्याला नैवेद्य म्हणून अर्पण केले आणि त्याचा रसग्रहणात्मक प्रसाद आपल्याला वाटला.
याचं महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं करतांना कुठेही थोडीदेखील कृष्णालीलांची सरसता कमी झालेली नाही. मग ते दही दूध चोरणं असो, मुरलीवादन असो, रासक्रीडेचा अलौकिक अनुभव असो, राक्षसमर्दन किंवा कुरुक्षेत्रातील भगवद्गीता असो. बुद्धिवादाच्या सावलीत कुठेही प्रेम, भक्ती झाकोळून गेलेली नाही. कुठेही कृष्णाचं परमात्मस्वरूप विसरून त्याला मानवांच्या श्रेणीत बसवण्यात आलेलं नाही. त्याच्या त्या घननीळ भग्वद्स्वरूपला कुठेही धक्का लागलेला नाही. याउलट जनसामान्यांना कृष्णलीलांच्या रसग्रहनाबरोबरच त्यामागच्या महान उद्दिष्टाचेही आकलन होते. त्यामुळे पुरुषोत्तम श्रीकृष्णाविषयी प्रेम, भक्ती आणि भावना अधिक डोळस आणि समृद्धच होते.
त्यामुळे श्रीकृष्णचरित्र हे अद्भुत आणि अमानवी न वाटता वाचकांना तो प्रत्येकातच कमी जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यतेचाच अविष्कार वाटतो आणि परमात्म्याच्या "अवतार" या संकल्पनेमागचा जीवनाचे आदर्श स्थापित करण्याचा उद्देश लक्षात येतो.

जीवनाचे रंग
खरं तर नेहमी प्रवास म्हटला कि माझी जरा कुरकुरच असायची . पण काही न काही कारणाने तो करावा लागतोच. त्यातही बसने! अशाच एका आवश्यक कारणासाठी मला पुण्याहून कोपरगावला जायचे होते. पुणे कोपरगाव रेल्वेचीसुद्धा त्या दिवशी व्यवस्था करता आली नाही. मग मी निघाले बसने. जरा नाराजीतच!
प्रवास सुरु झाला. रस्त्यात वेगवेगळी गावं लागत होती. तसे मला निसर्गसौंदर्य आवडत असले तरी त्यात फारशी रमून जाणारी मी नव्हे आणि माझा रस्ताही तसा नव्हता. रस्त्यात लहान मोठी खेडी लागत होती. मला बसचा प्रवास या कारणा साठी आवडत नसे कि बसमध्ये लागणाऱ्या धक्क्यांमुळे वाचन करता येत नाही. काही वाचता येत नसल्याने आणि खिडकीजवळची जागा असल्याने मी शेवटी बाहेरचे निरीक्षण करू लागले आणि तिथून पुढे माझा बसचा प्रवास कसा गेला कळलेच नाही.
कारण त्यादिवशी मला महाराष्ट्राच्या एका छोट्याशा पण मजेदार घटकाचे दर्शन झाले. प्रत्येक खेड्यागणिक बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची भाशा बदलत होती. रस्त्यावरच्या लोकांचे वेगवेगळे पोशाख बघायला मिळत होते. महाराष्ट्र म्हणजे केवळ पुणे मुंबई आणि तिथला सुशिक्षित शहरी परिसर नाही तर काही मैलागणिक बदलत जाणारी भाषा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा आहे याची मला जाणीव झाली. पुण्याच्या पांढरपेशा वातावरणाची सवय असललेल्या मला ते सगळं मजेदार तर वाटतच होतं . माझ्या वैयक्तिक मतानुसार निसर्गाचा सर्वात सुंदर अविष्कार मानवच आहे. त्यात जे वैविध्य आहे ते मला निसर्गाच्या वैविध्यापेक्षा जास्त भावते. माणसे बघणे, समजून घेणे हा सुद्धा पर्यटनाचा महत्वाचा भाग ठरू शकतो. मला जाणीव होत होती कि आपण ज्या जगात जगत आहोत त्या जगाला समांतर अशी कितीतरी जग या जगात जगत आहेत. प्रत्येकजण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. हि सर्वजणही माणसंच आहेत आणि आपणही माणसंच आहोत. मानवाच्या अस्तित्वाचे किती विविध अविष्कार या जगात आहेत!
पण या सगळ्या गोष्टींच्या मागे केवळ एक वैविध्य याहीपलीकडे काहीतरी आहे. सगळ्या सुसंधींचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल कि त्यातल्या ९०-९५ % संधी केवळ पुणे, मुंबई आणि इतर काही छोट्या शहरांमध्येच मिळतात. उच्चशिक्षण हा तर त्याचा एक छोटासा भाग झाला, पण साहित्य, संस्कृती, कला या गोष्टी सुद्धा या खेड्यातल्या लोकांना मिळू शकत नाहीत. पुण्यात घराबाहेर पडावे तर जागोजागी वाचनालये दिसतात हवी तेवढी पुस्तके मिळतात, पण एखाद्या छोट्याशा खेड्यात तुम्ही जाल तर दिसेल कि एखादे साहित्यिक पुस्तकच काय पण कधीकधी मुलांची क्रमिक पुस्तकेही मिळणे अवघड होऊन बसते मग या लोकांमध्ये कशी काय उच्च दर्जाची अभिरुची निर्माण होईल? त्यांना ती आवड नसते असे मुळीच नाही. तसे असायचे काही करणाच नाही पण उपलब्धता तर हवी ना ! संगीत किव्वा इतर कला या लोकांमध्ये नसतात असेही नाही. कला हि तर दैवी देणगी आहे. पण तरीही हे लोक त्या कलांच्या शास्त्रशुद्ध शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांची प्रगती होऊ शकत नाही. शहरात मात्र मुलांमध्ये कला असोत व नसोत लहानपणापासूनच त्याला या सगळ्या गोष्टींचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये एक सांस्कृतिक दरी निर्माण होते.
अर्थात असे होणे साहजिक असले तरी आपण त्याकडे डोळेझाक करतो आणि उलट या लोकांमध्ये बऱ्याचदा या गोष्टीबद्दल सुपिरिओरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो.. हा विचार केला जात नाही कि जर त्यांनाही आपल्यासारख्या संधी, घरातले वातावरण मिळाले असते तर तेदेखील आज वेगळ्या स्तरावर राहिले असते. या कॉम्प्लेक्स मुळे त्या लोकांचा आत्मविश्वास आणखीन खचत जातो आणि ती दरी वाढत जाते. म्हणूनच अशा स्तरांना जमेल ती मदत करून पुद्धे आणण्याचा प्रयत्न करणे श्रेयस्कर होईल.

आचरण
अध्यात्म हि गोष्ट बऱ्याच ठिकाणी दिसते. पण वास्तविक अध्यात्म म्हणजे काय? हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवावरून ठरते. असे असले तरी किमान आपण ज्या गुरूंना मानतो, ज्यांचे अनुयायी आहोत त्यांची शिकवण जगवणे हि एक मुलभूत बाब आहे. खरे तर गुरु किंवा देवता यांच्यावर एका व्यक्तीप्रमाणे प्रेम करणे साहजिक आहे पण अशा प्रकारच्या व्यक्तीपूजेबरोबरच तत्वपूजा झाली तर आपल्याला अध्यात्माचा खरा अनुभव येऊ शकतो. एखाद्या देवतेचा किंवा महात्म्याचा फोटो लावणे, मूर्ती बनवणे, त्यासमोर तासंतास बसून राहणे हे तर ठीकच आहे पण त्याबरोबरच त्या देवतेला किंवा महात्म्याला तत्वस्वरुपात स्वतःमध्ये स्थापित करणे अधिक आवश्यक आहे. कारण प्रेमाचा खरा अर्थ एकरूपता हाच आहे आणि अशी एकरूपता खोलवर पोहोचल्यावरच साधली जाऊ शकते. जेव्हा आपण खोलवर जातो तेव्हाच वैचारिक पातळीवर पोहचू शकतो. एखाद्याशी एकरूप होण्यासाठी त्याच्या अंतःकरणाचा ठाव घ्यावा लागतो, त्याच्या विचारांशी एकरूप व्हावे लागते. त्याच्या स्वभावाशी एकरूप व्हावे लागते. मगच तो सुखद अनुभव प्राप्त होतो आणि भावनाहीन असलेल्या बाह्य उपचारांचा फोलपणा जाणवू लागतो.
एकदा रस्त्याने जात असता एका संन्यासी महापुरुषाच्या प्रतिमेची मिरवणूक जातांना दिसली. ही मिरवणूक जरी एका संन्याशाची असली तरी त्यात सहभागी झालेले त्यांचे शिष्य आणि विशेष करून शिष्या यांचा थाट एखाद्या लग्नातल्या वरातीपेक्षा काही कमी नव्हता. उंची कपडे, एकापेक्षा एक भारी वस्तु , वेगवेगळे मेक अप्स असा होता. असे नाही कि हे सगळे करूच नये, पण किमान ज्यांच्यासाठी ही मिरवणूक चालली आहे त्यांच्या तत्वांचा आदर त्या मिरवणुकीत तरी करायला हवा. स्वतःला अध्यात्मिक समजत असलेल्या लोकांना हे किमान प्रसंगावधान असावे.
एकीकडे संयम, वैराग्य शिकवणारी प्रवचने चालू असतात आणि त्याच मंडपाबाहेर चाट, मिठाई, केक अशी विविध दुकाने असतात आणि सगळे भाविक त्रास होणार असला तरीही त्याची मजा लुटत असतात. नेहमीप्रमाणे काही जणांची आपसात निन्दानालस्ती चालू असते. खाण्यापिण्याची मजा लुटणे वाईट नाही पण हा प्रश्न उपस्थित होतो कि या प्रवचनातून लोक काय घेतात? कित्येकांचा तर असा समज आहे कि नुसत्या श्रवणानेच कल्याण होते. आचरण बदलण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात नाहीत. आपण जे ऐकले त्याचा विचार करणे, त्याप्रमाणे वागणे या गोष्टी झाल्या तरच हे सगळे सफल होईल. अन्यथा ते एक मनोरंजन बनून राहील. कार्यक्रम आयोजित करणारे लोकच अशा विसंगत गोष्टी एकत्र ठेवतात. अध्यात्म हि काही एवढी स्वस्त गोष्ट नाही कि जी नुसत्या श्रवणाने साध्य होईल. काही मजा करूच नये असे नाही पण हे दुटप्पी वागणेही योग्य नाही. कारण त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो.
ही तर अतिशय लहान गोष्ट आहे पण काहीवेळा तर आयुष्यभर शांततेचा उपदेश करणाऱ्या संतांच्या कार्यक्रमात हिंसाचार होतो. हे सगळे त्या महापुरुषाच्या उपदेशाशी अत्यंत विसंगत असते. त्या महापुरुषाच्या शिष्यांनी त्याच्याच मिरवणुकीत त्याच्याच शिकावानिवीरुद्ध वागणे त्या महापुरुषाला त्याच्या अंगावर कितीही उंची फुले उधळली तरी रुचण्यासारखे आहे का? त्या निःस्वार्थी आत्म्याला कितीही उंची भेटवस्तू प्रदान केल्या तरी आनंद होणार आहे का? ज्यांचे संपूर्ण आयुष्य विरक्त पद्धतीने गेले त्यांना या लौकिक प्रेमाचा आणि भौतिक गोष्टींचा काय मोह? त्याने आपल्याला क्षणिक मानसिक समाधानाशिवाय काहीच मिळत नाही.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)