गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

आज T V चालू केला कि कोणत्याही मराठी वाहिनीवर जा, विविध मालिकांचा भरणा झालेला दिसतो. त्यातही काही वाईट नाही, पण त्या मालिकांमध्ये काहीतरी कलात्मक आणि वैचारिक दर्जा तर असायला हवा. आज जग एकीकडे प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आपल्याला आपले संपूर्ण आयुष्य कमी पडेल एवढे ज्ञान जगात भरले आहे. असे असतांना या मालिका दररोज दिवसातून ३-३ वेळा त्याच त्याच विकृत लोकांनी निर्माण केलेल्या समस्या दाखवत आहेत. ए का ठिकाणी काय कोणी कोणाचा अपमानच करत असते तर दुसरीकडे कुटील कारस्थाने चालू असतात, तर तिसरीकडे चाबकाने मारणे चालू असते आणि लोक ते बघण्यात तासंतास रंगून गेलेले असतात आणि या मालिका अशा प्रकारे जाहिरातबाजी करतात कि एकदा जरी जाहिरात बघितली किवा पोस्टर बघितले तरी कथा आपल्या लक्षात यावी. तेसुद्धा प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रत्येक ब्रेअक मध्ये. हि कथानके थोडाफार बदल करून एकाच अंगाने जाणारी असतात.एक अत्यंत सज्जन सुशील स्त्री आणि बाकीचे सर्व तिला छळणारे लोक हा नेहमीचा format आहे.त्यादिवशी आम्ही एक मराठी चित्रपट बघण्यास बसलो असता खूप ब्रेअक्स होत होते आणि प्रत्येक ब्रेअक मध्ये २-३ वेळा एका सेरीअल ची जाहिरात लागत होती.त्यातील घटनांना अतिशय नाटकी आणि भडक पद्धतीने दाखवले जात होते. वास्तविक महाराष्ट्रात, भारतात, जगात इतक्या सुंदर गोष्टी आहेत आणि त्यात इतकी व्यापकता आहे त्यावर अनेक कार्यक्रम बनवता येतील. पण अशा प्रकारच्या गोष्टींचा मारा लोकांवर केला जातो कि त्यातूनnकाहीही हाती लागत नाही. घरातील महिला हे सगळा अतिशय नियमितपणे बघत असल्याने लहान मुलेही तेच बघू लागतात. त्यात अतिशय हास्यास्पद मेक अप्स , संवाद आणि हावभाव असलेल्या स्त्रिया लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. खरे तर देशाच्या प्रगतीसाठी माणसाच्या शैक्षणिक विकासाबरोबरच वैचारिक विकासही आवश्यक आहे आणि त्यासाठी बुद्धीला उत्तम विचारांचे पोषण हवे, पण जर तासंतास चालणाऱ्या मनोरंजनाचा हा दर्जा असेल तर ते कसे काय साधेल?

काळ संध्याकाळीच पुण्यातल्या जे एम रोडवर फिरायला म्हणून गेलो होतो. तसा पहिला तर हा भाग पुण्यातल्या अतिशय प्रमुख भागांमध्ये गणला जातो. शिवाय येथे फार उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू लोक येत असतात. परंतु तेथील दृश्य पाहून अतिशय वाईट वाटले. कुठे प्लस्तिक्चे ग्लासेस वापरून रस्त्यात फेकलेले होते तर कुठे वेफर्सची पाकिटे पडलेली होती तर कुठे थर्माकोलच्या प्लेट्स. एकीकडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इको फ्रेंडल ी गणेशोत्सवाचा इतका प्रचार चाललेला असताना दुसरीकडे अशा प्रकारे एका सुशिक्षित विभागात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या कचऱ्याचा असा ढीग असणे मनाला पटत नाही. आणि हे सगळे अरीशय सुशिक्षित वर्गाकडून होत असते हे आणखीनच निराशाजनक आहे. आज जग ग्लोबल वॉर्मिंगच्या आणि इतर समस्यांच्या इतके जवळ येऊन ठेपलेले असताना देखील सुसंस्कृत वर्गालाहि जाग येत नाही तर मग इतर लोकांचे काय? परंतु याची फळे आज न उद्या सर्वांनाच भोगावी लागणार आहेत.